भारतीय संगीत कलापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. मोबाईलवर वेबसाईट पाहणाऱ्यांनी वरील उजव्या कॉर्नरला असेलेल्या तीन रेषांना क्लिक करुन मेन्यू पाहता येईल. नवीन परीक्षा केंद्र-नियम व अटी - Bhartiya Sangeet Kalapith

नवीन परीक्षा केंद्र-नियम व अटी

 ओंकार संगीत विद्यालय व बहुउद्देशीय संस्था संचलित,

भारतीय संगीत कलापीठ

नवीन परीक्षा केंद्र मान्यता तसेच केंद्र व्यवस्थापकांसाठी नियम व अटी

                           कलापीठाचे  दि.०१/०४/२०२३ रोजीचे पत्र 'जा.क्र.: कार्या/२०२३-२४/ ०१' अन्वये 'नियम क्र.०१ ते १७' दि.०२ एप्रिल २०२३ पासून लागू .


०१.) प्रथम वर्षी दिलेली केंद्र संलग्नता व मान्यता ही त्या आर्थिक वर्षाकरिताच आणि तात्पुरत्या स्वरूपाची असेल. केंद्र संलग्नता व आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असून या कालावधी दरम्यानच पुढील वर्षीच्या मान्यता नूतनीकरणासाठी मा.रजिस्ट्रार यांच्याकडे तसा अर्ज सादर करावा लागेल. पुढील तीन वर्षानंतर कायमस्वरूपी मान्यता मिळण्यासाठी सदर परीक्षा केंद्राचा सांगेतिक कार्य अहवाल व कलापीठासाठी केलेल्या योगदानाचे अवलोकन करून याबाबत मा.रजिस्ट्रार यांचा निर्णय अंतिम असेल.

०२.) कलापीठाने निर्धारित केलेले संलग्नता शुल्क (एका संगीत प्रकारासाठी रु.५१०/- मात्र) ३१ मार्च अगोदरच अदा करावे लागतील. अन्यथा आपल्या केंद्राची मान्यता रद्द करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे. यासाठी कोणतीही पूर्वसूचना अथवा पत्रव्यवहार संस्थेद्वारे करण्यात येणार नाही.

०३.) मा.रजिस्ट्रार यांना आवश्यकता भासल्यास परीक्षा केंद्र व्यवस्थापकांना खालील कागदपत्रे अथवा माहिती सादर करण्यास ते सूचना करू शकतात. केंद्र व्यवस्थापकांना हे बंधनकारक असून तशी सूचना केल्यास ते विहित कालावधीतच सादर करावे लागेल. याशिवाय केंद्र मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

          अ) विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र ( कलापीठाने पाठविल्याप्रमाणे )
           ब) केंद्र व्यवस्थापक यांचे चारित्र्य प्रमाणपत्र, वैध ओळखपत्र व पत्त्याचा अधिकृत पुरावा.
          क) सबंधित संस्थेचे सांगेतिक कार्य अहवाल, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ई.
          ड) भविष्यात समस्या निर्माण झाल्यास त्याबाबत आवश्यक तो अहवाल, पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे,छायाचित्रे, पावती अथवा इतर आवश्यक दस्तऐवज.

       तथापि प्रतिज्ञापत्र किंवा यासंबंधीचे नियम व अटी केंद्र व्यवस्थापकांना मान्य नसल्यास अदा केलेले संलग्नता शुल्क कलापीठामार्फत नियमाप्रमाणे परत केले जाईल. यासंदर्भात तसा लेखी अर्ज ७ दिवसांचे आत कलापीठास सादर करणे केंद्र व्यवस्थापकांना अनिवार्य असेल.

०४.) नवीन परीक्षा केंद्रास मान्यता देण्यासाठी किमान ४० कि.मी. अंतराची मर्यादा असून अपवादात्मक परिस्थितीत मा.रजिस्ट्रार याबाबत स्थळ/काळ यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ शकतात.

०५.) आवश्यकता असेल तेव्हा केंद्राच्या कामकाजाची तपासणी अथवा परीक्षा केंद्र समीक्षा करण्यासाठी कलापीठाने प्रतिनिधीची नियुक्ती केल्यास त्यांना सर्व कागदपत्रे, नोंदवह्या आणि आवश्यक असलेली माहिती सादर करणे हे केंद्र व्यवस्थापकास बंधनकारक राहील.

०६.) केंद्र व्यवस्थापकांनी परीक्षार्थी नोंदवही, उपस्थिती नोंदवही, प्रवेश शुल्क नोंदवही व निकालाची नोंदवही नियमित अद्ययावत ठेवणे अनिवार्य आहे.

०७.) परीक्षा केंद्राबाबत कलापीठ कार्यालयास लेखी तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर मा.रजिस्ट्रार जो निर्णय घेईल तो केंद्र तथा केंद्र व्यवस्थापक यांना बंधनकारक राहील.

०८.) संस्थेमार्फत वेळोवेळी पाठविलेल्या मा.परीक्षक, प्रतिनिधी अथवा परीक्षार्थी यांच्याशी केंद्र व्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा अधिकार मा.रजिस्ट्रार यांना असेल.

०९.) परीक्षा केंद्राने नोंदणी केलेले नाव अथवा पत्त्यामध्ये बदल करावयाचा असल्यास त्यापूर्वी केंद्र व्यवस्थापकांनी अर्ज सादर करून मा.रजिस्ट्रार यांची लेखी परवानगी घेणे अनिवार्य असेल. 

१0.) परीक्षा केंद्रासंदर्भात तक्रारी तसेच इतर सर्व बाबींसाठी मा.रजिस्ट्रार यांनी दिलेला निर्णय परीक्षा केंद्र व्यवस्थापकांसाठी अंतिम असेल. मा.रजिस्ट्रार यांनी दिलेला निर्णय कोणताही वादविवाद न करता केंद्र व्यवस्थापकांसाठी लागू व बंधनकारक असेल.

११.) कार्यालयातर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व परीपत्रकांसाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे अवलोकन करावे, यासाठी केंद्र व्यवस्थापकांना वैयक्तिक सूचना देण्यात येणार नाही. 

१२.) परिक्षार्थींना इयत्ता १० वीच्या कला विषयाच्या वाढीव गुण मिळणे संदर्भात सर्व शासन निर्णय काळजीपूर्वक वाचून घ्यावे, नंतर याबाबतीत प्रतिक्रिया/वादविवाद ऐकून घेतले जाणार नाही.

१३.) मा.रजिस्ट्रार यांनी भविष्यात वेळोवेळी घेतलेले निर्णय/सूचना केंद्र व्यवस्थापकांस लागू असतील. याबाबत केंद्र व्यवस्थापकांना कोणत्याही प्रकारे वादविवाद करता येणार नाही.

१४.) कोणत्याही व्यक्तीने या संस्थेचा, संस्था पदाधिकाऱ्यांचा अथवा संस्थेच्या उपक्रमांचा कोणत्याही माध्यमाने लोकांना भडकवून अपप्रचार, संस्थेच्या विरोधात कोणतेही कार्य अथवा अवमान केल्याचे निदर्शनास आल्यास यासंबंधी कायदेशीर कारवाई होऊ शकते.

१५.) परीक्षा कार्य यथोचित संपन्न झाल्यानंतर केंद्रामार्फत जमा झालेल्या एकूण परीक्षा शुल्काचा २०% हिस्सा मा.रजिस्ट्रार यांच्या मंजुरीनंतर सदर केंद्रास केंद्र पुरस्कार म्हणून अनुज्ञेय राहील. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी मानधन देय नसून याबाबत दावा करता येणार नाही.

१६.) सर्व प्रकारच्या वाद-प्रतिवादासाठी न्यायालयीन कार्यक्षेत्र फक्त मा.न्यायालय, खुलताबाद हेच असेल.

१७.) वर नमूद केलेल्या कोणत्याही नियम व अटींचे परीक्षा केंद्र व्यवस्थापकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

                                                                                                             - मा. रजिस्ट्रार


Pages